Menu:

       बाळासाहेब पवार हायस्कुल,उडतरे          

पुणे बेंगलोर महामार्गावर वसलेले उडतरे हे गाव आहे. या गावात प्राथमिक शिक्षणाची सोय १८९६ साली झाली. परंतू उडतरे व उडतरे परीसरतीला विद्यार्थ्यांची माध्यमिक शिक्षणाची सोय उपलब्ध नव्हती.त्यामुळे मुलांची शिक्षणाची गैरसोय होती. हे ओळखून मा.महिपती पवार, गोपाळ पवार, रखमाजी बाबर, रामचंद्र पवार, श्री.बजरंग बाबर, श्री.सर्जेराव कुभार या व्यक्तींनी पुढाकार घेऊन कै.आबासाहेब वीर यांच्याशी चर्चा करुन सन १९७० मध्ये यशवंत शिक्षण संस्थेची उडतरे हायस्कूल,उडतरे ही शाखा सुरु केली. प्रथम इ.८वी चा वर्ग श्री.गोपाळ पवार यांच्या माडीवर सुरू झाला.

          त्यानंतर आनंदराव पवार यांनी आपला वाडा हायस्कूलसाठी दिला. त्या वाड्यात इ.८वी ते ११वी चे वर्ग भरु लागले. सन १९७४ मध्ये इ.११वी ची बॅच बाहेर पडली. विद्यालयास जागा मिळविण्याचा प्रयत्न सुरु झाला. तसेच इमारतीसाठी हनुमान व्यायाम मंडळ, उडतरे,मुंबई येथील ग्रामस्थ व गावातील ग्रामस्थ यांच्या प्रयत्नातून १९७५ साली संस्थेस ३५,००० रुपयांची रक्कम देण्यात आली. परंतू जागा उपलब्ध न झाल्यामुळे इमारत होऊ शकली नाही. मध्यंतरीच्या काळात गावाने विद्यालयास जागा व इमारत बांधण्यासाठी प्रयत्न करावेत म्हणून आनंदराव पवार यांनी आपला वाडा विद्यालयास देण्याचे नाकारले त्यामुळे १९८० ते १९८५ या कालावधीत शाळेचे खूप हाल झाले. शाळा गावात ५ ते ६ ठिकाणी भरु लागली. त्यामुळे शाळेच्या गुणवत्तेवर खूपच परिणाम झाला. १९८५ मध्ये शामराव पवार यांनी स्वमालकीची १ एकर ३० गुंठे जागा संस्थेस बक्षीसपत्राने दिली. त्यानंतर त्यावेळचे सचिव बा.ना.चिटणीस यांनी त्या जागेत १९८६ मध्ये तीन खोल्यांचे बांधकाम केले. सर्व शाळा एकत्र येण्यासाठी तीन खोल्या अपुर्‍या होत्या.

 

          विदयालयातील शिक्षक श्री.मोहिते डी.जे., श्री.मोहिते बी.बी., श्री.सुरेश बाबर, श्री.काथवटे पी.के यांच्या माध्यमातून नातू फाऊडेशन ट्रस्ट व डॉ. नातू यांच्या मदतीने विद्यालयच्या तीन प्रशस्त खोल्या व  संरक्षक भिंत व पाण्यासाठी बोअरवेल प्राप्त झाली. तसेच ग्रामस्थ उडतरे पंचक्रोषी याच्या सहकार्याने आणि संस्थेच्या सह्याने १७ खोल्यांची इमारत पूर्ण झाली. या इमारतीत इ. ५ वी ते १० वी पर्यंतचे वर्ग चालू झाले. विद्यालयाच्या गुणवत्तेतील चढउतार सन १९९० पर्यंत होत राहिले. १९९० नंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नामुळे गुणवत्तेत सतत वाढ होत गेली.  त्याचाच परीपाक म्हणून १९९० ते २०१२ या कालावधीत एस् .एस .सी. परीक्षेचा निकाल सरासरी ९० टक्के च्या पुढे लागला आहे. विद्यालय सर्व क्षेत्रात आघाडीवर असुन एस.एस.सी.मार्च १९९२ मध्ये कु. मोतलिंग प्रज्ञा एकनाथ हिने हिंदी विषयत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे. एस. एस. सी मार्च-१९९४ व १९९८ मध्ये अनुक्रमे कु. शेख आयेशा दस्तगीर व कु. मोहिते विद्या व्यंकट यांनी हिंदी विषयात कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक मिळवला  आहे.  तसेच क्रिडास्पर्धेत उंचउडी या विभागात  मनोज भरत पवार याचा राज्यस्तरावर सहभाग तसेच विद्यालयात माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा सन २००० मध्ये कु. मोहिते पल्लवी विजय हिने सातारा जिल्हात व्दितीय क्रमांक मिळवला आहे. तसेच ४ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक होते. तसेच सन २००६ – ०७ मध्ये विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग घेऊन विद्यालयाच्या उपकरणाची  राज्यपातळीवर निवड झाली होती. तसेच  मुख्याध्यापक संघाने आयोजित केलेल्या स्वच्छ  सुंदर व उपक्रमशिल शाळा या स्पर्धेमध्ये विद्यालयाचा तृतीय क्रमांक आला होत. तसेच विद्यालयात शालाबाह्य ३० उपक्रम सुरु आहेत.                       

                     

यशवंत शिक्षण संस्थेच्या सह्कर्याने विद्यालयात संगणक प्रशिक्षण सुरु झाले. तसेच सन २०१०-११ या शैक्षणिक वर्षात शिक्षण संचनालय, पुणे महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत आय.सी.टी. केंद्र सुरु झाले आहे. त्या अंतर्गत अंदाजे ७.५ लाख चे साहित्य उपलब्ध झाले आहे. त्याचा  लाभ ३९० विद्यार्थी घेत आहेत.  सध्या विद्यालयात इ.१०वी साठी जादा तास , दत्तक पालक योजना, माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन व जादा तास, शासकीय चित्रकला स्पर्धा , शिक्षक- पालक- विद्यार्थी संयुक्त सभा, सांस्कृतिक मंडळ , शालेय पोषण आहार, कन्या मंडळ, सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा असे अनेक उपक्रम विद्यालयात सुरु आहेत. गरिब व होतकरु विद्यार्थ्यांसाठी विद्यर्थी कल्याण निधी उपक्रम चालु केला आहे.