Menu:

       गुळुंब हायस्कुल गुळुंब

gulumb

 

        ‘विद्या’ तो भाग्यवंत असं ब्रीदवाक्य असलेल्या नि ख-या अर्थाने  यशवंत असलेल्या                                 

        यशवंत शिक्षण संस्था, वीरबाग सुरुर या संस्थेची ‘गुळुंब हायस्कुल गुळुंब, ही शाखा सन्माननिय त्या वेळचे सचिव बाबा चिटणीस यांच्या प्रेरणेने व त्यावेळचे सन्माननिय संचालक कै.रामचंद्र पाटील [माजी सभापती वाई], कै.ज्ञानेश्वर आण्णा यादव [भाऊ], कै.आमदार विठ्ठ्लराव जगताप, कै.किसनवीर, कै.रघुनाथदादा डेरे, कै.बाबुराव चव्हाण [नाना], कै.साहेबराव बाबर [बापु], कै.डॉ.रशिदखान मोकाशी यांच्या स्फूती ने १९६९साली सुरु झाली. .

      त्या वेळेचे उपसरपंच बाबाजी यादव, सरपंच चौणू कृष्णा जाधव, जिजाबा परबत्ती यादव, कृष्णा बाळा जाधव, यांचे बहुमोल सहकार्य लाभले तसेच शाखा  सुरु करण्यात कै. व्यकटराव पाटील, कै.विनायकराव पाटील यांनी सर्वप्रकारचे सहाय्य त्यावेळी केले.त्यावेळी ग़ुळुंबवरुन चालत सुरुरला मुले शाळेत जायची. सुरूवातीला बाबांनी तसेच पैलवान भाऊ कै.रामचंद्र पाटील यांनी चांदक, वेळे, गुळूंब, आनंदपुर येथील विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी या हेतुने प्रेरित होवून गुळूंब गावात शाळा सुरू करण्याची प्रेरणा घेतली व ती पूर्ण करून संपूर्ण सहाय्य केले.

      बाबा चिटणीस  नावाच ‘वादळ’ शिक्षण क्षेत्रात या भागात अद्वितीय कामगिरी करून गेलं. अत्यंत संयमी,शांत,सुस्वभावी या माणसाचा प्रचंड दरारा, जरब, आणि माणसं जमवण्याची हातोटी माणसं आपलीशी करण्याची कसब या अनेक गुणांनी परिपूर्ण असणा-या शिक्षण पांडितानं सुरुवातीस गावातील लोकाच्या व संचालकांच्या सहाय्याने गावातीलच दिगबंर कानडे,माधव कानडे यांच्या इमारतीत पहिला वर्ग सुरु केला रामचंद्र कानडे यांनी ही सहकार्य करत कानडे इमारत भाडेतत्वावर विद्यालयास बहाल केली.

       १९६९पासून कानडे इमारतीत पहिला ८ वी चा वर्गत्यावेळी सुरु केला सन्माननिय विष्णू गणपती जमदाडे हे मुख्याध्यापक म्हणून त्यावेळी काम करत होते. आणि  रामचंद्र जगन्नाथ लोखंडे हे पहिले लेखनिक म्हणून कार्यरत होते.

      गावातील लोकवर्गणीतुन सुरवातीस संस्था पगार देत असे. सन ७२ – ७३ पासून शासनाचेही सहकार्य मिळू लागले. कै.विठ्ठ्लराव जगताप (आमदार) यांच्या प्रयत्नातून ५ वीचे वर्ग हायस्कूलला जोडले गेले. पुढील काळात १९८२ च्या दरम्यान शाळेसाठी एका ट्रस्टीने जागा उपलब्ध करुन दिली. त्यावेळचे ट्रस्टी कै.गणपतराव पाटील, कै.बाळकृष्ण पाटील, कै.शंकर तुकाराम यादव, कै.खाशाबा पाटील, कै.आनंदराव (बाळू) पाटील, कै.लक्ष्मण पाटील, कै.बळीराम चांगण या ट्रस्टीने सव्वाएकर जागा उपलब्ध करून दिली. या जागेवर जिल्हा परिषदेकडून १९८६-८७ साली वस्तीगृह म्ह्णून चार खोल्या मंजुर करून बांधून घेतल्या.अशा प्रकारे लोकांच्या सहकार्यातून १० खोल्यांची प्रशस्त टोलेजंग इमारत उभी राहिली.

      

      विद्यालय आता गरुड भरारी घेत आहे. स्वच्छ सुंदर नि उपक्रमशिल शाळा बनविण्यासाठी प्रचंड उत्साहाने या विद्यालयात अनेक मुख्याध्यापकांनी स्वतःचे तन- मन- धन अर्पण करुन मोलाचे कार्य केले आहे. कै. विनायकराव लक्ष्मण जाधव नावाचं बाबांचं मानसपुत्र असलेले एक भारदस्त व्यक्तिमत्व या विद्यालयास खूप काळ मुख्याध्यापक म्हणून लाभले. त्यांनी या विद्यालयास शिस्त गुणवत्ता आणि प्रचंड नावलैकिक मिळवून दिला. विद्यालय उंच शिखरावर नेवून ठेवलं. कै. विनायकराव सरांच्या नंतरच्या मुख्याध्यापकांनीही त्यांनी लावून दिलेल्या शिस्तीचे पालन करत नि गुणवत्ता वाढवित विद्यालयाचा नावलैकिक वाढवत नेला. विद्यालयाच्या सौंदर्यात भर टाकण्याचे काम नंतरच्या काळात मुख्याध्यापकांनी केले. मुख्याध्यापक, शिक्षक आणि माजी विद्यार्थी यांनीही विद्यालयावर प्रचंड प्रेम,जिव्हाळा आत्मियता दाखवून शाळा आणि शाळेचे वैभव वाढविण्यास हातभार लावला. अलिकडच्या काळात संस्थेस लाभलेले तरुण तडफदार संचालक मंडळ आणि सन्माननीय सचिव अ‍ॅड.अरविंदराव चव्हान [तात्या] यांच्या कुशल नेतृत्वाने विद्यालय गरुड भरारी     घेत आहे.

      विद्यालयात अनेक उपक्रम राबविले जात आहेत. आमचा विद्द्यार्थी खड्कावर टाकला तरी उगवून आला पाहिजे असं अष्ट्पैलूत्व  निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न सदोदित राहिला आहे. गुणवंत मुख्याध्यापक व स्टाफ संस्थेने आजपर्यंत या विद्यालयास बहाल केला आहे. निरागस , निष्पाप बालकांच्या कळ्या फुलविणारे शिक्षक आणि किंबहूना तितकेच प्रेम, जिव्हाळा नि आत्मियता असणारं गाव आणि गावची माणसं आणि कार्यकर्ते सन्माननीय सरपंच व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.     
          विद्यालयात भरपूर शैक्षणिक साधनं  उपलब्ध आहेत. सुसज्ज प्रयोगशाळा, परिपूर्ण संगणक कक्ष, व समृध्द ग्रंथालय आहे. भव्य क्रीडांगण वनराईंनं नटलेलं आहे.    

          गुणवत्तेबरोबरच कला , क्रीडा,विज्ञान, तंत्रज्ञान आणि विविध उपक्रम या सर्वच क्षेत्रात आघाडीवर असलेलं आमचं विदयालय. सन्माननीय चिटणीस अ‍ॅड. अरविंदराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नि तरूण तडफदार संचालकांच्या कुशल मार्गदर्शनामुळे जिल्हयाला नव्हे तर महाराष्ट्र राज्यात एक आगळा वेगळा ठसा निर्माण करत आहे. या विद्यालयानं अनेक डॉक्टर, इंजिनिअर्स, समाजसेवक आणि अष्टपैलू सुसंस्कृत नागरिक निर्माण केले आहेत. अशीच परंपरा पुढे चालू ठेवण्याचा सर्व शिक्षक, सेवक आणि मुख्याध्यापक यांचा मानस नव्हे तर ध्येयच आहे.