Menu:

कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय , सुरूर          

ssvs

             

           प्रतिकूल परिस्थितीत दमदार वाटचाल करण्याची संस्थेची ख्याती आहे. आशेचा किरण पुन्हा संस्थेच्या/विद्यालयाच्या उभारणीसाठी नव्याने उदयाला आला. नवनिर्वाचीत संचालक अ‍ॅड.ललीत चव्हाण यांनी आपल्या कल्पक दूरदृष्टीने व्यापलेल्या आवाक्याचा योग्य उपयोग करुन आपले दमदार,कल्पक, विश्वसनीय पाऊल या विद्यालयाच्या विकासासाठी टाकले. शिक्षण प्रक्रियेतील होणारे वारंवर बदल विद्यार्थ्यांची मानसिकता, पालकांची उदासिनता नवीन शाळांचे फोफवलेले पीक व त्यातुन निर्माण झालेली स्पर्धा अशा अनेक समस्यांमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांच्या लक्षात आले . त्याचबरोबर या परिसरातील शैक्षणिक मरगळीस असलेली कारणे , ग्रामिण भागातील उच्चशिक्षणाची गैरसोय, मुलींची ससेहोलपट , पालकांच्या मनातील संभ्रमावस्या अशा अनेक कारणाचा अभ्यास केला. २००८-०९ साली त्यानी विद्यालयाच्या जीर्णोध्दारासाठी एक नवे शैक्षणिक पर्व उदयाला आणले . पंचक्रोशीत स्वतः गावोगावी रात्रं-दिवस भ्रमन करुन लोकांशी संपर्क साधुन त्यानी केली. आज शेकडो विद्यार्थी या महविद्यालतयात शिक्षण घेत आहेत . विशेषतः ग्रामिण भागातील मुलींच्या शिक्षणाची हेळसांड यामुळे थांबवण्याचे महत कार्य झाले . गेल्या ३ वर्षाचे निकल पाहता ते कधीही ८५% च्या आत आलेले नाहीत. व्यक्तिमत्व विकासारखे अनेक उपक्रम आणि त्यांच्याकलागुणांना वाव देणार्‍या अनेक संधी यामुळे उपलब्ध झाल्या आहेत. अ‍ॅड. ललीत चव्हाण यांनी प्रायोगिक तत्त्वावर घेतलेला कनिष्ठ महाविदयालयाचा प्रयोग शत- प्रतिशत यशस्वी झाला. त्यासाठी शिक्षकांचे सहकार्य लाभेल. आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते की या विद्यालयाला आलेली मरगळ काही क्षणात झटकण्याचे कार्य पार पाडले. ही यशस्वीता पंचक्रोशीतील माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांना खूप भावली. आणि त्यामुळेच पुढे आणखी काहितरी करण्याचे मनबोल संचालकांना मिळाले ही यशाची घोडदौड पुढेही निरंतर रहावी, यासाठी सुयोग्य नियोजन, वारंवारिता, गुणवत्ता वाढीचा नेहमी घेतला जाणारा आढावा, पालकांचे समुपदेशन यासाठी त्यांनी आपल्याला पूर्णपणे झोकून दिले. 
           कनिष्ठ महाविद्यालयाची निर्मिती ही खरेतर आम्ही यशवंत परिवारचे घटक एक ऐतिहासिक घटना समजतो. त्याहीपुढे जाऊन त्यांनी २००५- १० मध्ये परिसरतील पालक – विद्यार्थींसाठी एक अनमोल सुवर्णसंधी प्राप्त करून दिली. श्री. शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूल अ‍ॅड. ललित चव्हाण यांनी मोठ्या प्रतिकूल परिस्थितीत सुरू केले. इंग्रजी माध्यमाकडे वाढणारा पालकांचा ओढा त्यासाठी खूप दूरवर जाऊन महागडे शिक्षण घेणारे विद्यार्थी यांचा त्यांनी अभ्यास केला. आणि परिसरातील ही एक गंभीर आणि आव्हानात्मक समस्या त्यांच्या दूरदृष्टीन सोडवली गेली.२०१२-१३ या शैक्षणिक वर्षात नर्सरी पासून इ. ३ री पर्यंत २०० विद्यार्थी गुणवत्तपूर्व शिक्षण घेत आहेत. हे सर्व होताना भौतिक सुविधांचा अभाव निर्माण होऊ नये, म्हणून त्यांनी नवीन ७ खोल्या बांधल्या संगणकाचे ज्ञानही या विद्यार्थींना मिळावे, म्हणून संगणक कक्ष अत्यंत अत्याधुनिक केला. व विनामूल्य शिक्षणाची दारे बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना खुली करुन दिली.
भविष्यात या विद्यालयच उत्कर्षाच्या दिशेने याहीपेक्षा दमदार, आश्वासक अशी विचारधारा सदैव जागृत राहिल,यात शंका नाही. फिनिक्स पक्षी जरुर आपल्या जिवनकाळात उभारी घेतो. त्या प्रमानेच या विद्यालयाचा विकास उत्तरोत्तर प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाने फुलत रहवा,यासाठी यशवंत परिवार सदैव जगरुक राहणार आहे. सर्व संचालक मंडळ,आजी-माजी शिक्षक,विद्यार्थी,पालक, ग्रामस्थ त्यासाठी सकारात्मक पायवाटेने या पंचक्रोशीचा उध्धार करतील यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षीत आहे.हा लाखमोलाचे ‘यशवंत’ विचार तळागाळातील लोकांच्या विकासासाठी,पंचक्रोशींच्या कल्याणासाठी,विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी अधिक प्रफुल्लीत व्हावा ,हिच परमेश्वराजवळ प्रार्थना!!!