Menu:

श्री शिवाजी विद्यालय , सुरूर 

           ज्या यशवंत विचाराने महाराष्ट्र घडवला , त्या नेतृत्वाच्या कृतीयुक्त विचारांनी पावनस्पर्श झालेली यशवंत शिक्षण संस्था !!! १२ जून १९६० साली मा. कै. आबासाहेब वीर आणि  तर्कतीर्थ लक्ष्मणशात्री जॊशी यांच्या यशवंत रुपी मेंदूतून स्थापन झलेली तीच ही  संस्था !  कै .दे.भ.किसन महादेव उर्फ आबासाहेब वीर या महान संस्थापक अध्यक्षांच्या कुशल मार्गदर्शनाखाली १३ जून १९६० साली या संस्थेचे पहिले वहिले पुष्प म्हणजे 'श्री शिवाजी विद्यालय ,सुरूर' ! जिल्हा लोकल बोर्डाच्या धर्मशाळा सुरूर येथे संस्थेची पहिली शाखा मोठ्या दिमाखदार परंतु अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चालू झाली . तदनंतर आजअखेर संस्थने कधीही मागे न पाहता आपली वाटचाल चालू ठेवली . श्री बा.ना. उर्फ बाबासाहेब चिटणीस , ते अ‍ॅड.अरविंदराव चव्हाण यांच्या प्रदिर्घ सुवर्णमहोत्सवी कार्यकालात आजपर्यंत ६ शाखा , १ भाग शाळा , १ कनिष्ठमहाविद्यालय व १ इंग्लिश मेडीयम स्कूल असा संस्थेचा शैक्षणिक प्रसार झाला.ss१९६० साली समाजापुढील अनेक समस्यांनी निर्माण झालेल्या वादळा  समोर लोकशिक्षणाशिवाय कोणताच पर्याय नव्हता. मा.आबासाहेब वीरांबरोबर कै.बाबुराव सावळाराम उर्फ नानासाहेब चव्हाण, कै.साहेबराव कृष्णराव बाबर, कै .डॉ .रशिदखान मोकाशी, स्वा.सै .रघुनाथदादा डेरे , कै .बाळकृष्ण अनंत साबळे उर्फ किसनराव साबळे पाटील, कै .रामचंद्र जाधव, कै.ज्ञानेश्वर आण्णा यादव यांच्या अथक परिश्रमाच्या जीवावर संस्था दिमखादार उभी आहे.

ssvs

 

        १३ जून १९६० साली स्थापन झालेल्या  श्री शिवाजी विद्यालय,सुरूरचा इतिहास संघर्षमय तर आहेच, परंतु विशेष म्हणजे सुरुर पंचक्रोशिला तेजोमय मार्ग़दर्शन देणारा आहे. सुरुवातीच्या काळात सुरुर,कवठे, बोपेगाव, पांडे, ओझर्डे, विठ्ठ्लवाडी, गुळुंब,केंजळ, चांदक, आनंदपुर, वेळे, भिलारवाडी,वहागाव,मोहाडेकवाडी इ. वाडया वस्त्यांवरुन या विद्यालयात विदयार्थी- विद्यार्थीनी शिक्षणास यायचे.त्यावेळच्या परिस्थितीत आणि आजच्या परिस्थितीत खूप मोठा फरक आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्याकाळी  विद्यार्थी- शिक्षक व संस्थाचालक आपल्या महान ध्येयाच्या उद्दिष्ठाच्या दिशेने वाटचाल करत होते. शिक्षकांचे पगार भागविण्यासाठी दारोदारी हिंडून १-१ रुपया गोळा करायचे .प्रसंगी स्वतःची पदरमोड करुन आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या संसारावर तुळशीपत्र वहून त्यांनी पवित्र शिक्षणज्योत तेवत ठेवली.
        या श्री शिवाजी विद्यालयच्या स्थापने पासूनचा इतिहास पाहता आजवर अनेक विद्यार्थी अनेक क्षेत्रात हा यशवंतरुपी दीपक दिपस्तंभाप्रमाणे तेवत ठेऊन या परिसराला उजळून टाकण्याचे महतकार्य करत आहेत. साहित्य,कला,क्रीडा,सहकार,सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक,माहिती तंत्रज्ञान, संरक्षण, अशी विविध क्षेत्रे या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ढवळुन काढली आहेत. आपली यशवंत पताका फडकवताना अभिमानाने यशाची उत्तुंग शिखरे सर करीत आहेत. आजही या विद्यालयात शालेय विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या सुयोग्य देवाणघेवाणीने सर्वकंष व्यक्तिमत्त्व विकासाला पुरेपुर न्याय देण्याचे काम चालु आहे. जवळपास १०१ प्रकल्प-उपक्रम विद्यालयात यशस्वीरीत्या राबवले जातात.
शाळा हे एक ज्ञानमंदिर आहे. त्या ज्ञानमंदिरच्या आजुबाजुचा परिसर नेहमी स्वच्छ, सुंदर, वनराईने नटलेला असला पाहिजे. त्याहीपेक्षा तो आकर्षक,प्रसन्न असावा. त्या दृष्टीने संस्था- शाळेशी निगडीत अनेक घटकांनी या 'वीरबागेच्या' परिसराला एक आगळी वेगळी झळाळी दिली. आजही हे विद्यालय परिसरातील शेतकरी,कष्टकरी, श्रमजीवी पालकांच्या पाल्यांना आधुनिक शिक्षणासाठी खुनावत आहे.
        आजपर्यंतची वाटचाल पहता विद्यार्थी संस्थेसाठी शाळेला विशेष वेगळी अशी कोणतीही उपयोजना करायला लागली नाही. यातच विद्यालयाच्या उत्कर्षाचे रहस्य लपले आहे. जगाच्या बाजारपेठेत ‘यशवंत’ चा विद्यार्थी कोठेही उभा राहिला तर वाकणार नाही. यासाठीच्या अनेकविध उपयोजना विद्यालयात जाणीवपुर्वक मार्गक्रमण करीत आहेत. भविष्यातही आदर्श विद्यालयचे स्वप्न उराशी घेऊन सर्वजन अहोरत्र प्रयत्न करताना दिसतात.
या विद्यालयाला मोठ्या उदार मनाने आपली स्वतःची जागा देणारे श्री. मारुती काळे व मोकाशी बंधू यांचे ऋण न विसरण्यासारखे आहेत. कारण या संस्थेचा आजचा विस्तार पाहता जीथे यशवंत विचारांची पायाभरणी झाली. ती जागा खरोखरच शक्तीस्थळ आहे. या वीरबागेच्या परिसराला नवसंजीवनी देण्याचे काम संस्थेचे माजी चिटणीस श्री.बाबासाहेब चिटणीस, कै. मामा ससाणे, कै. बाबासाहेब मुल्ला यांसारख्या महान विभूतींच्या सुयोग्य नियोजनाखाली अनेक शिक्षकांनी जीवाचे रान करून लतावेलींचे समृध्द्, नयनमनोहर असा परिसर निर्माण केला. परिसरातील शिक्षणदानाचे एकमेव केंद्र म्हणून या शाळेकडे पाहिले जाते. आजही ती परंपरा अबाधित ठेवण्यासाठी विद्यामान सचिव अँड. अरविंदराव चव्हाण यांच्या कुशल नेतृत्त्वाखाली या विद्यालयाच्या उत्कर्षासाठी व शैक्षणिक विकासासाठी अनेक आजी-माजी मुख्याध्यापकांनी आपले यशस्वी योगदान दिले.
सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पर्वात  विद्यालयाने अनेक चढ- उतार अनुभवले  शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी  असलेल्या प्रयत्नांना थोडीफार खीळ बसण्याचे धक्के  सहन करताना मनाला वेदना होत होत्या ज्या विद्यालयाने यशाचे  माउंट एव्हरेस्ट पाहिले. त्यात विद्यालयाची मोहीम थोडीफार थंडावल्यासारखी अवस्था निर्माण झाली. थोडक्यात म्हणायचे झाले तर ‘पठारावस्था’ होण्यासारखी स्थिती निर्माण झाली. परंतु काळ कोणासाठी थांबत नाही.
        प्रतिकूल परिस्थितीत दमदार वाटचाल करण्याची संस्थेची ख्याती आहे. आशेचा किरण पुन्हा संस्थेच्या/विद्यालयाच्या उभारणीसाठी नव्याने उदयाला आला. नवनिर्वाचीत संचालक अ‍ॅड.ललीत चव्हाण यांनी आपल्या कल्पक दूरदृष्टीने व्यापलेल्या आवाक्याचा योग्य उपयोग करुन आपले दमदार,कल्पक, विश्वसनीय पाऊल या विद्यालयाच्या विकासासाठी टाकले. शिक्षण प्रक्रियेतील होणारे वारंवर बदल  विद्यार्थ्यांची  मानसिकता, पालकांची उदासिनता नवीन शाळांचे  फोफवलेले  पीक व त्यातुन निर्माण झालेली स्पर्धा अशा अनेक समस्यांमुळे ही परिस्थिती निर्माण  झाल्याचे त्यांच्या लक्षात आले . त्याचबरोबर या परिसरातील शैक्षणिक मरगळीस असलेली कारणे , ग्रामिण भागातील उच्चशिक्षणाची  गैरसोय, मुलींची ससेहोलपट , पालकांच्या  मनातील  संभ्रमावस्या अशा अनेक कारणाचा अभ्यास केला. २००८-०९ साली त्यानी विद्यालयाच्या  जीर्णोध्दारासाठी एक नवे शैक्षणिक पर्व उदयाला आणले . पंचक्रोशीत स्वतः गावोगावी  रात्रं-दिवस भ्रमन करुन  लोकांशी  संपर्क  साधुन  त्यानी केली. आज शेकडो विद्यार्थी या महविद्यालतयात शिक्षण घेत आहेत . विशेषतः ग्रामिण भागातील मुलींच्या शिक्षणाची हेळसांड यामुळे थांबवण्याचे महत कार्य झाले .  गेल्या ३ वर्षाचे निकल पाहता ते कधीही ८५% च्या आत आलेले नाहीत. व्यक्तिमत्व विकासारखे अनेक उपक्रम आणि त्यांच्याकलागुणांना  वाव  देणार्‍या अनेक संधी यामुळे उपलब्ध झाल्या आहेत. अ‍ॅड. ललीत चव्हाण यांनी प्रायोगिक तत्त्वावर घेतलेला कनिष्ठ महाविदयालयाचा प्रयोग शत- प्रतिशत यशस्वी झाला. त्यासाठी शिक्षकांचे सहकार्य लाभेल. आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते की या विद्यालयाला आलेली मरगळ  काही क्षणात झटकण्याचे  कार्य पार पाडले. ही यशस्वीता पंचक्रोशीतील  माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांना खूप भावली. आणि त्यामुळेच पुढे आणखी काहितरी करण्याचे मनबोल संचालकांना मिळाले ही यशाची घोडदौड पुढेही निरंतर रहावी, यासाठी सुयोग्य नियोजन, वारंवारिता, गुणवत्ता वाढीचा नेहमी घेतला जाणारा आढावा, पालकांचे समुपदेशन यासाठी त्यांनी आपल्याला पूर्णपणे झोकून दिले.           
        कनिष्ठ महाविद्यालयाची निर्मिती ही खरेतर आम्ही यशवंत परिवारचे घटक एक ऐतिहासिक घटना समजतो. त्याहीपुढे जाऊन त्यांनी २००५- १० मध्ये परिसरतील पालक – विद्यार्थींसाठी एक अनमोल सुवर्णसंधी प्राप्त करून दिली. श्री. शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूल अ‍ॅड.  ललित चव्हाण यांनी मोठ्या प्रतिकूल परिस्थितीत सुरू केले. इंग्रजी माध्यमाकडे वाढणारा पालकांचा ओढा त्यासाठी खूप दूरवर जाऊन महागडे  शिक्षण घेणारे विद्यार्थी यांचा त्यांनी अभ्यास केला. आणि परिसरातील ही एक गंभीर आणि आव्हानात्मक समस्या त्यांच्या दूरदृष्टीन सोडवली गेली.२०१२-१३ या शैक्षणिक वर्षात नर्सरी पासून इ. ३ री पर्यंत २०० विद्यार्थी गुणवत्तपूर्व शिक्षण घेत आहेत. हे सर्व होताना भौतिक सुविधांचा अभाव निर्माण होऊ नये, म्हणून त्यांनी नवीन ७ खोल्या बांधल्या संगणकाचे ज्ञानही या विद्यार्थींना मिळावे, म्हणून संगणक कक्ष अत्यंत अत्याधुनिक केला. व विनामूल्य शिक्षणाची दारे बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना खुली करुन दिली.
        भविष्यात या विद्यालयच उत्कर्षाच्या दिशेने याहीपेक्षा दमदार, आश्वासक अशी विचारधारा सदैव जागृत राहिल,यात शंका नाही. फिनिक्स पक्षी जरुर आपल्या जिवनकाळात उभारी घेतो. त्या प्रमानेच या विद्यालयाचा विकास उत्तरोत्तर प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाने फुलत रहवा,यासाठी यशवंत परिवार सदैव जगरुक राहणार आहे. सर्व संचालक मंडळ,आजी-माजी शिक्षक,विद्यार्थी,पालक, ग्रामस्थ त्यासाठी सकारात्मक पायवाटेने या पंचक्रोशीचा उध्धार करतील यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षीत आहे.हा लाखमोलाचे ‘यशवंत’ विचार तळागाळातील लोकांच्या विकासासाठी,पंचक्रोशींच्या कल्याणासाठी,विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी अधिक प्रफुल्लीत व्हावा ,हिच परमेश्वराजवळ प्रार्थना!!!