रोशनी-द लाईट ऑफ साऊथ एशिया या अमेरिकेत प्रकशित झालेल्या मासिकामध्ये वाईच्या एका मराठी शास्त्रज्ञाचा परिचय आला आहे.या शास्त्रज्ञाचे नाव डॉ.अशोक जोशी.त्यांचे यश व त्यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान अनुकरणीय आहे. या दोन गोष्टी त्यांचे साधेपण व सुसंस्कृत जीवन उलगडून दाखवितात.अफाट कर्तृत्वाबरोबरच दातृत्व असलेली ही महान व्यक्ती आपल्या मातीला व मातेला विसराली नाही. केंजळ सारख्या छोट्या गावी आपल्या मातेच्या स्मरणार्थ कमलाबाई जोशी केंजळ विद्यालयास ७ लाख रुपयाची देणगी नुकतीच दिलेली आहे.
प्रसिध्दी माध्यमातून दूर राहणारे, संकोची स्वभावाचे डॉ. अशोक यांनी त्यांच्या अचूक निर्णय क्षमतेच्या जोरवर अनेक क्षेत्रात नेतृत्व केले आहे.निश्चित दिशा व अथक प्रयत्न यातच त्यांचे यश व असामान्यत्व सामावलेले आहे. डॉ.अशोक यांचे वाईशी नाते जवळचे व जिव्हाळ्याचे आहे. त्यांचे बालपण वाईतच गेले.वाईच्या द्रविड हायस्कूलचे ते विद्यार्थी. प्रसिध्द विचरवंत तर्कतीर्थ श्री.लक्ष्मणशात्री जोशी त्यांचे काका व प्रसिध्द आयुर्वेदाचार्य श्री. वेणीमाधवशास्त्री जोशी त्यांचे वडील. त्यांच्या घरात स्वातंत्र्य संग्रामातील मोठ्या व्यक्तिंची नेहमीच वर्दळ असायची त्यामुळे डॉ.अशोक यांचा सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक थोर व्यक्तिंशी संपर्क आला आहे.सविस्तर वाचा